ब्रेकिंग - बंदी आदेश मोडून नमाज पठण ; 25 जणांना अटक 

25 people arrested Detention order kolhapur ichalkaranji corona virus
25 people arrested Detention order kolhapur ichalkaranji corona virus

इचलकरंजी (कोल्हापूर) - लॉकडाऊन असतानाही शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमाव करून प्रार्थनास्थळात जमलेल्या तब्बल 25 जणांना गावभाग पोलिसांनी अटक केली. शांतीनगर जाधवमळा परिसरात 15 तर साईट नं. 102 परिसरात 10 जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 9 मोटरसायकली जप्त केल्या. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी आहे. त्याच अनुषंगाने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे, मंदिरे, चर्च, गुरद्वारे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना येथील शांतीनगर जाधवमळा परिसरातील पाकिजा मशिदीत सामूहिक नमाज पठण करण्यात येत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नमाज पठण करणाऱ्या अन्वर राजासाहेब गडेकर (वय 60), शब्बीर अजम्मोदिन बागवान (67), जावेद दाऊद कुकरी (32), मुसा आप्पालाल नगारजी (55), उस्मान मेहबुब डांगे (21), अब्बास दाऊद कुकरी (38), नजीर शब्बीर बागवान (42), बादशहा हुसेन मुजावर (51), ऐजान चॉंदसाब दुरग (45), दिलावर जाफर निजाम (49), अस्लम मुसा नगारजे, मकबुल बाबालाल बागवान (74), सोहिल दस्तगीर जमादार (32), सैफअली शहनुल्ला तराळ (21) व उबेदुल्ला हिम्मत तांबोळी (35, सर्व रा. शांतीनगर, जाधवमळा) यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्यांच्याकडील 9 मोटारसायकलही जप्त केल्या. 

सहकारनगर साईट नं. 102 परिसरातील पॉवर हाऊसजवळील रिकाम्या शेडमध्ये जमाव करून नमाज पठण करण्यात येत असल्याचे आढळले. तेथीही पोलिसांनी कय्युम शहानवाज बागवान (35), साकीब अब्दुलकरिम मोमीन (18), जिनत बादशहा अल्लाउद्दीन मतवाली (62), फयुम शहानवाज बागवान (30), नजीर शकील मुल्ला (30), सादिक अब्दुलकरीम मोमीन (18), गफार हनिफ मुजावर (18), युनुस मदारसाहब सनदी (26), गैबीसाब खुतबुद्दीन मुल्ला (54) व वजीर महम्मद शेख (वय 35 सर्व रा. सहकारनगर साईट नं. 102) या दहा जणांना ताब्यात घेतले. सर्वांवर लोकसेवक आदेशाचे पालन न केल्याच्या कारणावरुन गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई गावभागचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकाने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com