शेतीपंपासाठी दहा तास वीजपुरवठा देणार : सोनंदकर

शेतीपंपासाठी दहा तास वीजपुरवठा देणार : सोनंदकर

पंढरपूर : शेतीपंपाच्या वीज पुरवठयात अचनाक कपात केल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतीपंपाला दिवसा सलग आठ तास वीजपुरठा द्यावा या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर यांनी शेतीपंपासाठी दहा तास वीजपुरवठा देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीजपुरठ्यात अचनाक कपात करुन आठ तासावरुन चार ते पाच तास वीजपुरवठा दिला जात आहे. कमी दाबाच्या आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. अशातच वीज वितरण कंपनीने अचानक शेतीपंपाच्या वीज पुरवठ्यात कपात केल्याने शेतर्यांच्या समस्येत अनेक भर पडली आहे. 

सध्या खरीप हंगाम संकटात असतानाच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर रब्बीच्या पेरणी केल्या आहेत. मात्र, शेतीपंपाला नियमित व पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा मिळत नसल्याने पेरणी केलेली वाया जाण्याची भीती आहे. याशिवाय ऊस, केळी, डाळिंब यांसारखी पिकेदेखील विजेअभावी संकटात आली आहेत.

शेतकऱ्यांना दिवसभरात पुरेसा व नियमित वीजपुरवठा करावा या मागणीसाठी आज युवक काँग्रेसच्या वतीने येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.

शेतकऱ्यांनी अचनाक ठिय्या आंदोलन केल्यामुळे कार्यालयातील अधिकार्यांची धावपड उडाली. सुमारे दोन तासाच्या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनवणे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनामध्ये पिंटू भोसले, शिवाजी देशमुख, मिलिंद भोसले,  नितीन शिंदे, कल्याण घुले, कृष्णा कवडे, संदीप शिंदे, दिलीप मलपे,धनंजय पाटील, सोमनाथ आरे,सावकार गायकवाड, दिलीप जाधव, सौदागर क्षीरसागर,राजाराम गायकवाड,तानाजी नागणे,सुभाष भोसले, महादेव माळी, रुबाब शेख आदी कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com