मातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख

maruling-ganpati
maruling-ganpati

मंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.

तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू मार्तुलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्ट वतीने आयोजित केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते.सुर्योदया ते सुर्यास्त पर्यंत भरणाय्रा यात्रेची महापुजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विधीवतपणे करण्यात आली.

या पुजेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर,विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, जिल्हा परिषदेच्या शैला गोडसे ,नितीन नकाते, प्रणव परिचारक,बापूराया चौगुले, अविनाश शिंदे, अनिल बिराजदार, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील, कल्लाप्पा  पाटील,संतोष सोनगे,किसन भजनावळे,नायब तहसिलदार सुधाकर मागाडे,पोलिस निरीक्षक अनिल गाडे,आदीसह सिध्दापूर ग्रामस्थ व ट्रस्ट चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सिद्धापूर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गणपतीच्या मूर्तीच्या दर्शनासाठी दरवर्षी  क्रिकांतीच्या दुसय्रा दिवशी भरणाय्रा एक दिवशीय यात्रेस कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.परंतु निधी कमतरतेमुळे भाविकाना पुरेशा सुविधा देताना सिध्दापूर ग्रामपंचायतीवरही ताण पडत आहे.भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे यात्रा कालामध्ये चांगल्या सुविधा यात्रेकरू व व्यापाय्राना देणे व या परिसराचा विकास करणे आदी साठी कुडल संगमच्या धरतीवर विकास होणे आवश्यक आहे. पालकमंत्र्याच्या आश्वासनाने भाविकाच्या आशा पल्लवित झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com