व्हॉट्‌सऍप बंद होणार? 

Will WhatsApp be turned off
Will WhatsApp be turned off

सोलापूर : सध्याच्या तंत्रज्ञान युगात लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांच्या हातात स्मार्ट फोन दिसत आहेत. सोशल मीडियावरील "फेसबुक', "व्हॉट्‌सऍप' हे क्षणाक्षणाला पाहणे त्यांचे सुरू असते. त्यात होणारे चॅटिंग, गमती जमती, काही महत्त्वाचे अपडेट्‌स अन्‌ बरंच काही ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळते. चार दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा पाहता बरंच काही समजून घेता येत आहे. त्यात अँडराईड प्ले स्टोअरवर सर्वात जास्त डाऊनलोड होणाऱ्या ऍपमध्ये व्हॉट्‌सऍप पाचव्या क्रमांकावर आहे. हेच ऍप सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरले जाणारे आहे. येणाऱ्या नवीन वर्षात व्हॉट्‌सऍप बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे, असे मेसेज सध्या व्हायरल होऊ लागले आहेत. 

हेही वाचा : यांनी सोडली पिचाडांची साथ 
काही मोबाईलच्या मॉडेल्समधून आता व्हॉट्‌सऍप हद्दपार होण्याची माहिती मिळतं असल्याची शंका आहे. एकीकडे व्हॉट्‌सऍपचे फायदेही सांगितले जात आहेत आणि दुसरीकडे व्हॉट्‌सऍप बंद करण्याचे ऐकण्यात येत आहे, त्यामुळे अनेकांत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्याचे कम्युनिकेशनचे माध्यम म्हणून व्हॉट्‌सऍपकडे पाहिलं जात आहे. सर्वाधिक वापरले जाणाऱ्या सोशल मीडियामध्ये व्हॉट्‌सऍपमध्ये नेहमीच अपडेट देत असते. त्यावरून मोठ्या प्रमाणावर मेसेज फॉरवर्ड केले जातात. मात्र काही मोबाईलच्या मॉडेल्समधून व्हॉट्‌सऍप गायब होणार आहे. ऍप वापरणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेचे कारण व्हॉट्‌सऍप कंपनीकडून देण्यात येत असल्याची चर्चाही तरुणाईमध्ये आहे. काही दिवसांपासून कंपनी ऍपमध्ये अनेक वेगवेगळे फीचर्सचे अपडेट्‌सही देत आहे. 

हे आहेत धमाकेदार फिचर्स 
युजर्सला आकर्षित करण्यासाठी सातत्याने व्हॉट्‌सऍप आपल्या फिचर्समध्ये बदल घडवून आणत आहे. भारतात व्हॉट्‌सऍपला अधिक पसंती दाखवली जात आहे. यातच व्हॉट्‌सऍप कंपनीने आपल्या युजर्ससाठी ग्रुप इनव्हाइट फीचर (group invite), रिमाइंडर (WhatsApp Reminder), कॉल वेटिंग (Call Waiting) या तीन धमाकेदार फिचर्सचा यात समावेश केला आहे. यामुळे युजर्सच्या आनंदात आणखी भर पडणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी? 
नेमके काय? 

व्हॉट्‌सऍपने जो नवा पर्याय आणला आहे, ते चांगलच आहे. ग्रुप इनव्हाइट फीचर हे बनवले ते उत्तमच केले आहे. जेणेकरून समोरचा व्यक्ती ग्रुपमध्ये ऍड व्हायचे असेल तरच होईल, मात्र एकीकडे व्हॉट्‌सऍप बंद होणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे नेमकं काय समजत नाही. 
- श्रावणी उपलंची, तरुणी 
अन्यथा अडचणी येऊ शकतात.. 

मोबाईलच्या मॉडेल्समधून आता व्हॉट्‌सऍप हद्दपार होण्याची माहिती मिळतं आहे. हे करणे योग्य नाही. कित्येक कामे व्हॉट्‌सऍपमुळे सुरू असतात. यामुळे कामामध्ये खूप अडचणी येऊ शकतात. 
- स्वाती आडम, युवती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com