'पेठांतील महापौर व्हावा, इच्छा पूर्ण झाली'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

कोल्हापूर : "बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेचा महापौर व्हावा, ही इच्छा पूर्ण झाली. यासाठी पेठेतील मंडळींनी शब्द दिला होता. म्हणूनच मी आणि आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांनी सौ. सरिता मोरे यांना महापौरपद दिले. सर्व पेठातील नागरिकांनी एकत्र येऊन महापौरांचा हा सत्कार केल्याबद्दल मला समाधान वाटले'', असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. 

कोल्हापूर : "बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेचा महापौर व्हावा, ही इच्छा पूर्ण झाली. यासाठी पेठेतील मंडळींनी शब्द दिला होता. म्हणूनच मी आणि आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांनी सौ. सरिता मोरे यांना महापौरपद दिले. सर्व पेठातील नागरिकांनी एकत्र येऊन महापौरांचा हा सत्कार केल्याबद्दल मला समाधान वाटले'', असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. 

बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेच्या वतीने 27 वर्षानंतर भागामध्ये महापौर पदांचा मान मिळविल्याबद्दल महापौर सौ. सरिता मोरे, उपमहापौर भुपाल शेटे यांचा नागरी सत्कार केला. आमदार मुश्रीफ, आमदार क्षीरसागर, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते महापौर सौ. मोरे, उपमहापौर श्री. शेटे यांचा श्री अंबाबाईची मूर्ती, शाल, बुके देऊन सत्कार केला. 

महापौर पदाच्या निवडणूकीत अनेक घटना घडल्याचे सांगून आमदार मुश्रीफ म्हणाले,"आम्ही शहराचा विकास व्हावा म्हणून 1200 कोटींपेक्षा जास्त निधी शासानकडून दिला. राज्यामध्ये अनेक महापालिकेत सत्ता आहे; पण इथल्या महापालिकेत सत्ता नाही, हे भाजपला शल्य होते. मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी अखेर लक्ष घातले. महापौर, उपमहापौरांची निवड झाली. अनेक गोष्टी आड आल्या. साडेचार वर्षात भाजपने राजकारण सोडून निधी दिला असता तर शहराचा विकास झाला असता.'' 

उपमहापौर शेटे म्हणाले, ""पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन कोटी 59 लाख निधी आणला; पण या निधीतून साधे रस्त्यांची कामेही पूर्ण होणार नाहीत. पिण्याचे पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न, शाहू जन्मस्थळ आम्ही पूर्ण करणार आहोत.'' 

आमदार क्षीरसागर म्हणाले, ""शहराचे उत्पन्न अत्यल्प आहे. हे उत्पन्न वाढ झाली तर सुबत्ता येते. महापौर, उपमहापौरांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत.'' 

महापौर सौ. मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. नंदकुमार मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. धनंजय सावंत, दिगंबर फराकटे यांनी स्वागत केले. अंकुश निपाणीकर यांनी सुत्रसंचालन केले. सुभाष मोरे, माजी महापौर ऍड. महादेवराव आडगुळे, मारुतराव कातवरे, रविकिरण इंगवले, उदय पोवार, नगरसेवक किरण शिराळे, दिगंबर फराकटे, सौ. उमा बनसोडे, माजी महापौर आर. के. पोवार, सौ. माधवी गवंडी, प्रतापसिंह जाधव, विनायक फाळके, धनंजय सावंत, माजी महापौर बाजीराव चव्हाण, प्रा. जयंत पाटील, परिक्षित पन्हाळकर आदी उपस्थित होते. 

निधीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार 
आमदार सतेज पाटील म्हणाले, ""जीएसटी झाल्यानंतर विदर्भात महापालिकांना 100 कोटींचा निधी दिला. शहराचे उत्पन्न वाढीसाठी जीएसटीतून 50 कोटींधा निधी मिळावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांनी भेटणार आहोत.'' 

Web Title: Wish of Mayor is from Peth area is completed says Hasan Mushrif