'विकिमिडिया कॉमन्स'द्वारे जगभरातील रसिक घेतील वाचनाचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर : मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुनीलकुमार लवटे यांनी विकिमिडिया कॉमन्स या मुक्त ज्ञानस्रोतात आपली एकूण 21 पुस्तके प्रताधिकारमुक्त करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आता जगभरातील वाचक ही पुस्तके कधीही कोणत्याही साधनाचा वापर करून वाचू शकतील. डाऊनलोड करून पाठवू शकतील.

पुढच्या टप्प्यात ही पुस्तके विकिस्रोत या मुक्त ग्रंथालयात युनिकोड रुपासह समाविष्ट होतील. जेणेकरून ही सर्व पुस्तके इंटरनेटवर सर्चेबल होतील. विकिपीडियामधील लेखांना तसेच इतर प्रकारच्या लेखनाला विविध विषयावरचे हे साहित्य संदर्भासाठी उपलब्ध झाले आहे.

भविष्यातील ज्ञानाच्या स्वरुपाची गरज लक्षात घेवून लवटे सरांनी दूरदृष्टीचा परिचय देत इतर लेखकांना प्रेरणा दिली आहे. यापूर्वी जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, इरावती कर्वे, माधव गाडगीळ यांनीही आपली काही पुस्तके मुक्त करून दिली आहेत. या दानामुळे आज विकिमिडिया कॉमन्सवरील मराठी पुस्तकांच्या संख्येचे शतक ओलांडण्याचा विक्रमही झाला आहे. या दानामुळे विशेषत: त्यातील वाचनीय पुस्तकांमुळे जगातील ज्ञानस्रोतात प्रथमच वाचनशास्त्र या पुस्तकाची नवीन श्रेणी नोंदविली गेली आहे. या उपक्रमात इंटरनेटवर  मराठीतून ज्ञान वाढण्यासाठी प्रयत्न करणारे सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

खालील लिंकवर ही पुस्तके आपण पाहू शकता -

Category:Books by Sunilkumar Lawate

Category:Books in Marathi

Web Title: Wkimedia commons provide 21 online books