सांगलीत लांडग्याचा हल्ला: 17 शेळ्या ठार; मेंढपाळांना सतर्कतेचे आवाहन

पशुवैद्यकीय आधिकारी यांनी जखमी शेळ्यांवर औषध उपचार केले आहेत.
Wolf Attack
Wolf Attack Eskal

तुंग (सांगली) : येथील शेतात वस्तीला असलेल्या मेढपाळाच्या कळपावर रात्री दिडच्या सुमारस लांडग्याच्या हल्ल्यात (Wolf) 17 शेळ्या (Goat) ठार झाल्या, तर 2 दोन शेळ्या गंभीर अवस्थेत आहेत. घटनास्थळी वनविभागाच्या पथकाने (Forest department) दाखल होत पहाणी करुन पंचनामा केला आहे. तर पशुवैद्यकीय आधिकारी यांनी जखमी शेळ्यांवर औषध उपचार केले आहेत.

ओढ्याकडेला असलेल्या बाळू यादव यांच्या ऊस गेलेल्या शेतात तीन दिवसापासून अडीचशे शेळ्या मेंढ्यांचा कळप बसवण्यात आला होता. गुरुवार रात्री दिडच्या सुमारास तीन लांडगे, तरस सदृश्य प्राण्याने हल्ला केला. शेळ्यांच्या ओरडण्याने वस्तीवर असलेल्या गजानन आरगे, शितल आरगे, प्रकाश भानूसे यांनी तीन वन्यप्राण्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Wolf Attack
कोल्हापुरात एसटी सुरु करण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर

मोबईल बॕटरीच्या प्रकाशात तळावर पाहिले असता सतरा शेळ्या ठार तर दोन गंभीर अवस्थेत असल्याचे दिसुन आले. शेळ्या दोन दावणीला बांधलेल्या असल्याने हल्याच्या दरम्यान त्यांना पळणे शक्य झाले नाही. त्यामुळे दावणीला असलेल्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला केला. यात एकापाटोपाट १९ शेळ्यांवर हल्ला केला. यामध्ये मेंढपाळाचे २.५० लाखाचे नुकसान झाले आहे. वनविभागाचे अधिकारी युवराज पाटील, वनरक्षक दत्तात्रय भोसले, सागर थोरवत, पोलिस पाटील सौ श्रृती गुरव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनाजी भानूसे, पशु वैद्यकीय आधिकारी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. वनविभागाने मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच गावातील पशुपालक व मेंढपाळ यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com