
Sangli Police : पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून मुंबई परिसरातील डॉक्टर महिलेने स्वतःवर ब्लेडचे वार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी फाटा परिसरात घडली. शुभांगी समीर वानखडे (वय ४४, इएसआयएस हॉस्पिटल, क्वार्टर टाईप ४, बिल्डिंग नंबर १, फ्लॅट नंबर ५, एल.बी.एस.मार्ग, मुलुंड, पश्चिम ग्रेटर, मुंबई) असे तिचे नाव आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार संदेश यादव यांनी फिर्याद दिली असून, इस्लामपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.