
मिरज : शहरातील अमननगर परिसरात मुलासोबत उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या महिलेस भरधाव दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. जोहराबी रशिद सौदागर (वय ५८, रा. बरगाले प्लॉट, मिरज) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातप्रकरणी दोन अल्पवयीनांसह अभिषेक उर्फ संतोष महादेव कांबळे (वय २३) आणि ओंकार संभाजी कांबळे (२१, दोघेही रा. कोल्हापूर रोड, पंढरपूर चाळ, मिरज) यांच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. बुधवार (ता.१३) रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.