जट कापली...पण देवी काही नाही कोपली

jat kapali
jat kapali

श्रीगोंदे : आजही खेड्यात अज्ञानामुळे अनेक रूढी-परंपरा कायम आहेत. केसांतील जट झाली तर ती तशी वाढू देतात. देवीची अवकृपा असल्यानेच आपल्या केसात जट झाली, असे समजले जाते. एकदा का केसांत जट झाली की मग तिने हयातभर देवीची सेवा करायची. जट कापली तर मोठी अवकृपा होते...

जटेची जटील परंपरा 

देवदैठण येथील महिलेच्या केसात अशीच जट झाली होती. परंतु तिच्या कुटुंबियांनी समंजस भूमिका दाखवली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी जट निर्मूलन केले. यासाठी पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे यांनी पुढाकार घेतला. जट निर्मूलन केले, परंतु त्यांच्यावर देवी काही कोपली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अंनिसने सिद्ध केले की ही केवळ अंधश्रद्धा आहे. 

दीडशेहून अधिक जट उतरवल्या 
देवदैठण येथे घरकाम करणाऱ्या ललिता ओहोळ यांच्या केसांत दहा वर्षांपासून जट तयार झाली होती. कल्याणी लोखंडे यांनी त्यांचे प्रबोधन केले. ललिता व पती सुभाष या दोघांनी जट काढण्यासाठी सहमती दर्शवली. लोखंडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क करीत बोलावून घेतले. जाधव यांनी राज्यातील 157 महिलांच्या अशा जटा उतरवल्या आहेत. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचे तीन हजार कार्यक्रम घेतले आहेत. 

दहा वर्षांच्या त्रासातून सुटका 
दहा वर्षांपासून होणाऱ्या त्रासापासून ओहोळ यांची यामुळे सुटका झाली. लोखंडे यांनी ललिता ओहोळ यांना साडी-चोळी भेट देऊन सन्मान केला. माजी सरपंच मंगल कौठाळे, "अंनिस'च्या पार्वती कदम, सौरभ साळुंके, सतीश कौठाळे, प्रकाश परदेशी उपस्थित होते. 

अस्वच्छतेतून होते जट 
ग्रामीण भागातील महिला बऱ्याचदा केस विंचरत नाहीत. केसांची व्यवस्थित निगा न राखल्याने जट तयार होते. एकदा जट तयार झाली की तशीच वाढू दिली जाते. देवीचा प्रकोप झाल्यानेच केसांत जट आली,अशी अनेक दिवसांपासून अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेपायी अनेकांची कुटुंब उदध्वस्त झाली आहेत. देवीचा प्रकोप वगैरे असे काही नसते, असे अंनिसच्या रंजना गवांदे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com