बेकायदेशीर दारु बंदसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

सोलापूर : वारंवार निवेदने देऊनही बार्शी तालुक्‍यातील साकत गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याने तेथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. काही महिलांनी प्रवेशद्वारावर बसून आंदोलन केले तर काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पडवीतच ठिय्या मांडला. 

राज्य उत्पादन शुल्क, पोलिस अधिक्षक यांना यापूर्वीही निवेदन देण्यात आली आहेत. परंतु, गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याचे महिलांनी सांगितले. दारु विक्रीमुळे गावातील अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्यांना तातडीने तडीपार करावे, गावातील दारु विक्री बंद करावी, गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करावा अशा मागण्या या महिलांनी मांडल्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण करणार असल्याची माहिती महिलांनी दिली. दुष्काळ आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना या महिलांनी घेराव घालत आपली कैफियत मांडली. 

साकत गावातील महिलांनी मांडलेल्या बेकायदेशीर दारु विक्रीच्या प्रश्‍नावर तातडीने तपास करून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येतील. 

- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री, सोलापूर

Web Title: Women agitation for illegal liquor