शेततळ्यात बुडून मायलेकीचा मृत्यू

Drown
Drown

श्रीगोंदे - घारगाव (ता. श्रीगोंदे) येथील पानसरे वस्तीवर सोमवारी जनावरांना पाणी काढण्यासाठी गेलेल्या कमल बापू पानसरे (वय 36) व वर्षा बापू पानसरे (वय 16) या मायलेकींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

कमल पानसरे या वर्षासोबत गायीला पाणी पाजण्यासाठी त्यांच्या शेततळ्यावर गेल्या होत्या. वर्षा पाणी काढण्यासाठी शेततळ्यात उतरली; मात्र प्लॅस्टिकच्या कागदावरून पाय घसरून ती पाण्यात पडली. तळ्यात असलेल्या दोराच्या मदतीने तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला; मात्र दोर तुटला. कमल पानसरे यांनी साडीचा पदर लेकीकडे फेकला; पण त्या प्रयत्नात त्याही पाण्यात पडल्या अन्‌ दोघींचाही बुडून मृत्यू झाला. पाणी पिण्यासाठी गेलेल्या गायींपैकी एक गाय घरी आल्यामुळे कमल यांच्या सासऱ्यांना संशय आला. ते शेततळ्यावर गेले, तेव्हा नात व सुनेचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. वर्षाने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत 72 टक्के गुण मिळविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com