रायबागात नगरसेविकेचा कोरोनाने मृत्यू; तणावपूर्ण वातावरणात अधिकारी धारेवर

कोविड सेंटरजवळ तणाव; नागरिकांकडून अधिकारी धारेवर
रायबागात नगरसेविकेचा कोरोनाने मृत्यू; तणावपूर्ण वातावरणात अधिकारी धारेवर

रायबाग : येथील प्रभाग ९ मधील ६५ वर्षीय नगरसेविकेचा कोरोनाने (covid 19) गुरूवारी (६) मृत्यू झाला. त्यांच्यावर रायबागच्या (raibag) सरकारी कोविड सेंटरमध्ये (covid center) उपचार सुरू होते. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे (oxygen) त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शासनाकडून लॉकडाउनची (lockdown) अमंलबजावणी सुरू असून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोविड सेंटर सुरू केल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे. रायबाग येथे ३० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. एका नगरसेविकेवर उपचार सुरू होते. उपचारावेळी ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक व नागरिकांनी केला आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी कोविड केंद्र परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

रायबागात नगरसेविकेचा कोरोनाने मृत्यू; तणावपूर्ण वातावरणात अधिकारी धारेवर
चीन जगाच्या जीवावरच उठलंय? अंतराळातून ओढावणार संकट

घटनेचे गांभीर्य ओळखून रायबागचे तहसीलदार (raibag police) डॉ. मोहन भस्मे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. बाणे, मंडल पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कोविड सेंटरमध्ये विविध सुविधा आहेत. ऑक्सिजन सिलिंडर संपल्यावर त्वरित पुरवठा होत असल्याचे सांगत उपस्थितांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण तणाव अधिक वाढत जावून वाद-विवाद झाला. तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही बराच वेळ वातावरण तापले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com