संघ विचारधारेत महिलांना स्थान नाही : डॉ. करंदीकर 

Women have no place in Rss: Dr Karandikar
Women have no place in Rss: Dr Karandikar
Updated on

संगमनेर : ""राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आजही पुरुषसत्ताक पद्धती असून, त्यांच्या विचारधारेत महिलांना स्थान नाही. महिलांना मनुस्मृतीचा अवलंब करायला लावणारी चूल आणि मूल ही संस्कृती त्यांची असून, हिंदुत्वाची कल्पना ब्राह्मणकेंद्री आहे,'' असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद करंदीकर यांनी व्यक्त केले. 
स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित समाजवादी कार्यकर्ता संमेलनाच्या समारोपाच्या वेळी "राष्ट्रवाद' या विषयावर ते बोलत होते. शिक्षणतज्ज्ञ प्रा. हरजिंदर सिंह (कवी लालटू) अध्यक्षस्थानी होते. 

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व झाले 
डॉ. करंदीकर म्हणाले, ""गोमांस न खाणारे राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचा पाठपुरावा न करणारे देशद्रोही किंवा शहरी नक्षलवादी असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. सध्या हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व झाले असून, हिंदुत्वाचा अर्थ ते ठरवतील तो आहे. एका कालखंडात परकीय हल्लेखोरांच्या विरोधात राष्ट्रवादाची कल्पना जन्माला आली. ती स्थिरावण्यापूर्वीच भारतीय विचारवंतांनी ती कल्पना टाकाऊ असल्याचे सांगितले होते. पृथ्वीवरील माणसांनी पर्यावरण रक्षणासाठी राष्ट्रांच्या सीमा धुसर केल्या पाहिजेत. जागतिक पर्यावरणाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बनणे गरजेचे आहे.'' 

समाजवाद समजून घेण्याची गरज 
प्रा. हरजिंदर सिंह म्हणाले, की डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद व्यापक असावा असे सांगताना, देशावर प्रेम करण्यासाठी राष्ट्रवादाची गरज नाही. देशाला आज महात्मा गांधी यांच्या विचारांची व लोकशाही समाजवाद समजून घेण्याची गरज आहे. नागरिकत्वाच्या कायद्यात नोंदणी न करण्याचा, स्त्री सुरक्षेविषयी योग्य पावले उचलावीत, शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारने तत्परता दाखवावी, शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळावा व पुढील संमेलन साने गुरुजींच्या जन्मभूमीत घेण्याचे ठराव या वेळी करण्यात आले. 

पद्मभूषण देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्र सेवा दलाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी आभार मानले. समितीच्या अध्यक्ष ऍड. निशा शिवूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com