कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांचा पुढाकार महत्त्वाचा - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

कोल्हापूर - महिला आणि पुरुष अशा दोघांनीही कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचवावा यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी रोजगार स्वयंरोजगाराच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आजपासून ताराराणी महोत्सवाला प्रारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. 

कोल्हापूर - महिला आणि पुरुष अशा दोघांनीही कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचवावा यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी रोजगार स्वयंरोजगाराच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आजपासून ताराराणी महोत्सवाला प्रारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. 

दरम्यान, बुधवारपर्यंत (ता. १५) महोत्सव सुरू राहणार आहे. शिवाजी पेठेतील खराडे कॉलेजच्या मैदानावर महोत्सव भरला आहे. उद्‌घाटन सोहळ्याला खासदार धनंजय महाडिक, महापौर हसीना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, माजी महापौर सई खराडे, बांधकाम सभापती सीमा पाटील, शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंसहायता बचत गटांची चळवळ प्रभावी ठरत आहे. या माध्यमातून महिलांची नवी शक्ती निर्माण होत आहे. बचत गटांच्या माध्यमातून संघटित होणाऱ्या महिलांना प्रशिक्षित करणे, त्यांना कमी व्याज दरात कर्ज मिळवून देणे, त्याचबरोबर बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ मिळवून देणे यांसाठी शासन प्रयत्नशील आहे. तालुकास्तरावर त्यांच्यासाठी विक्री केंद्रे निर्माण व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बचत गटांनी वस्तूंचे उत्पादन करत असताना गुणवत्ता राखावी तरच ते बाजारपेठेत टिकू शकतील.’’ 

खासदार धनंजय महाडिक यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. त्यासाठी ताराराणी महोत्सव हे एक सक्षम व्यासपीठ ठरत आहे, असे सांगितले.  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून, ते महिलांच्या आर्थिक स्वावलंबनापुरतेच मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. 

खासदारांचे कौतुक 
कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांचे पालकमंत्री पाटील यांनी तोंडभरून कौतुक केले. संसदेत सर्वाधिक प्रश्‍न विचारून त्यांनी कोल्हापूरची मान देशात उंचावली असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

Web Title: women initiative importance for family development