esakal | सांगली : प्रियकराकडून गोकुळनगरमधील महिलेचा गळा आवळून खून | Murder
sakal

बोलून बातमी शोधा

Kajal Gudravat
सांगली : प्रियकराकडून गोकुळनगरमधील महिलेचा गळा आवळून खून

सांगली : प्रियकराकडून गोकुळनगरमधील महिलेचा गळा आवळून खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - येथील गोकुळनगरमधील महिलेचा प्रियकरानेच ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली. काली उर्फ काजल मोहन गुदरावत (३०, रा. गोकुळनगर, सांगली) असे त्या महिलेचे नाव आहे. किरकोळ कारणातून हा खून केल्याचे समोर आले असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. जुनेद अब्दुलवाहीद सवार (वय ३०, रा. खामकर गल्ली, खणभाग, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, श्रीमती बेबी गिराप्पा येळवकर (गोकुळनगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत काजल गुदरावत ही महिला मुळची राजस्थानमधील भिलवाडा येथील आहे. दीड वर्षापुर्वी ती सांगलीत राहण्यास आली होती. त्यावेळी संशयित जुनेद सवार याची आणि तिची ओळख झाली होती. जुनेद आणि काजल यांची प्रेमसंबंध जुळाले. त्यामुळे वारंवार येणे जाणे होते. सोमवारी जुनेद काजल हिच्या घरी आला. घरगुती कारणातून दोघांत वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर जुनेद याने ओढणीने गळा आवळला. त्यात गुदमरून काजल हिचा मृत्यू झाला. मृत झाल्यानंतर जुनेद तेथून पळून गेला.

हेही वाचा: कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची सक्ती कायम

दरम्यान, काल सकाळी नऊच्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या बेबी येळवकर काजल हिच्या घरी आल्या. त्यावेळी काजल मृतावस्थेत पाहून त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनमा केल्यानंतर घातपात असल्याचा संशय प्राथमिक तपासात आला. येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर काजल हिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. त्यानुसार तपासाची चक्रे फिरविण्यात आली. प्राथमिक माहिती अधारे दोन तासांच्या आत संशयित जुनेद सवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस आदिनाथ माने आणि स्वप्निल कोळी यांनी सखोल चौकशी केली असता त्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करून त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, विलास मुंढे, अतुल माने, किरण कांबळे, अक्षय ताटे, संदीप घस्ते, एम. एन. मुलाणी, तेजस कुंभार, ऋतुराज होळकर यांचा कारवाईत सहभाग होता. सहायक निरीक्षक पल्लवी यादव अधिक तपास करत आहेत. दरम्यान, संशयित जुनेद यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

loading image
go to top