सोनोग्राफी केंद्रात महिलांचे चित्रीकरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

कोल्हापूर - सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या महिलांचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

संबंधितांविरुद्ध तक्रार झाली असून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे आता सोनोग्राफी सेंटरही संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. त्यामुळे महिलांनो सावधान..! असे म्हणायची वेळ आली आहे.

कोल्हापूर - सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या महिलांचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

संबंधितांविरुद्ध तक्रार झाली असून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे आता सोनोग्राफी सेंटरही संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. त्यामुळे महिलांनो सावधान..! असे म्हणायची वेळ आली आहे.

चेंजिंग रूम, बाथरूममध्ये छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केले जात असल्याचे मुद्दे यापूर्वी चर्चेत आले आहेत. खुद्द केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या विषयाला वाचा फोडली होती. त्यामुळे गोव्यापासून दिल्लीपर्यंत हा विषय तापला. कोल्हापुरातीलही एक ब्रॅण्डेड शोरूम फोडले. यानंतर छुप्या कॅमेऱ्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संबंधित मालकांनीही दक्षता घेण्यास सुरवात केली. एकीकडे छुप्या कॅमेऱ्याबाबत गैरव्यवहार टाळण्यासाठी जनजागृती होत असतानाच शहरातील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये चक्क महिलांचे चित्रीकरण होत असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधितांकडून या चित्रीकरणाची क्‍लिप काही मित्रांनाही दाखविली जात असल्याची माहिती तपासांती पुढे आली आहे. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा मात्र संबंधित महिलेने त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई होण्यासाठी 
प्रयत्न केले.

कायद्यावर बोट ठेवून महिलेने प्रक्रिया राबविली. पुढे हा विषय कायद्याच्या कक्षेत उभा राहिला आणि प्रत्येक मुद्यांवर ‘पोस्टमार्टम’ होऊ लागले. महिला पोलिस अधिकाऱ्यांनाही तेथे बोलवून माहिती घेतली. त्यांची चौकशीही झाली. मात्र, काही तांत्रिक बाबींतून ही घटना चारचौघांतच राहिली आहे. ज्यांनी तक्रार केली त्यांचे कौतुकच आहे; पण अन्य महिलांचे चित्रीकरण होऊ नये, यासाठी महिलांनीच आता सावधान राहण्याची गरज आहे. थेट छुप्या कॅमेऱ्यातून सोनोग्राफी करताना महिलांचे चित्रीकरण करण्याचा प्रकार निंदनीय आहे.  गंभीर बाब म्हणून आता महिलांनी सावध राहण्याची वेळ आहे.

तांत्रिक मुद्यावर तपास थांबला
शहरातील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये असा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. महिला सेंटरमध्ये आल्यानंतर सोनोग्राफी करण्यापूर्वीपासून त्या सेंटरमधून बाहेर जाईपर्यंत संबंधितांकडून त्यांचे छुप्या कॅमेऱ्यातून चित्रीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे. याची संबंधीत पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मात्र काही तांत्रिक मुद्यावर हा तपास तूर्तास थांबल्याचे सांगण्यात आले.

Web Title: women shooting in sonography center