दोन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

टाकळी ढोकेश्‍वर - गावातील निवडुंगेवाडीमधील तरुण विवाहितेने आपल्या दोन छोट्या मुलांसह आज सकाळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. उज्ज्वला दत्तात्रेय निवडुंगे (वय 25) असे तिचे नाव आहे. तिने मुलगा आराध्य (वय पाच) व मुलगी श्रावणी (वय तीन) यांच्यासह सकाळी आठच्या सुमारास विहिरीत उडी मारून मरणाला कवटाळले. या दुर्घटनेची माहिती समजल्यावर पारनेरचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. त्यांनी तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. उज्ज्वलाचे माहेर वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील आहे. तिच्या मृत्यूबद्दल नातेवाइकांनी संशय व्यक्त केला.

टाकळी ढोकेश्‍वर - गावातील निवडुंगेवाडीमधील तरुण विवाहितेने आपल्या दोन छोट्या मुलांसह आज सकाळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. उज्ज्वला दत्तात्रेय निवडुंगे (वय 25) असे तिचे नाव आहे. तिने मुलगा आराध्य (वय पाच) व मुलगी श्रावणी (वय तीन) यांच्यासह सकाळी आठच्या सुमारास विहिरीत उडी मारून मरणाला कवटाळले. या दुर्घटनेची माहिती समजल्यावर पारनेरचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. त्यांनी तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. उज्ज्वलाचे माहेर वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील आहे. तिच्या मृत्यूबद्दल नातेवाइकांनी संशय व्यक्त केला. याची चौकशी करण्याची मागणी तिने केली आहे.

Web Title: women suicide