प्रशासकीय मंजुरी अगोदरच काम पूर्ण!

नागेश गायकवाड
बुधवार, 4 जुलै 2018

आटपाडी (सांगली) : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून तांत्रिक मंजुरी मिळालेल्या निंबवडे- पळसखेल रस्त्याचे काम प्रशासकीय मंजुरी अगोदर मशिनरीच्या साह्याने पूर्ण करण्याची अनोखी किमया येथे घडली आहे. या गैरव्यवहारात चक्क पंचायत समितीचे पदाधिकारी सहभागी आहेत. या प्रकारावर स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. याशिवाय शेटफळे आणि बनपुरी येथेही असाच प्रकार सूरू आसून चौकशीची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.                                            

गळवेवाडी ते पळसखेल या 700 मीटर रस्त्याच्या कामाला पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने रोजगार हमी योजनेतून आठ दिवसापूर्वी तांत्रिक मंजुरी दिली होती. सदरच्या कामाची फाईल गळवेवाडीतील ग्रामस्थांनी दाखल केली होती. ती फाईल पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेतली. पाच लाख रुपये या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

कामाला प्रशासकिय मान्यता, जिओ टॅगींग आणी मस्टर मागणी न करताच कामासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या समितीच्या दुसरयाच गणातील सदस्याने रोहयोचे हे मजूराऐवजी पोकलँडने चारच दिवसात पूर्ण केले. सदरचे काम ग्रामस्थांनी आडवले होते, मात्र राजकीय रेटा वापरून पूर्ण केले. यानंतर पैसे काढण्याची हालचाली केल्यावर बिंग फुटले.                  

असाच प्रकार एका सदस्याने बनपुरीत केला आहे. तर शेटफळेतही ओढापात्रातील गाळ काढण्याच्या कामात अधिकारयाच्या कृपेने राजरोज सूरू आहे. याबाबत लेखी तक्रार झाली आहे.              

शेटफळेत गाळाच्या रोहयोच्या कामावर मजूर नाहीत. कामात अनियमिता आहे. चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
- मयुर गायकवाड (तक्रारदार)             
 
पळसखेल कामाचे जिओ टॅगीग झाले नसून मस्टर काढलेले नाही. या कामाला प्रशासकिय मान्यता देणार नाही.
-मिनाताई साखुंळे, (बीडीओ,आटपाडी)

Web Title: work complete before administrative permission