ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठीच्या हालचालिंना वेग 

ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठीच्या हालचालिंना वेग 

आटपाडी - आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळ गावी माडगुळे येथे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती झेडपीचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी दिली.   

श्री. देशमुख यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेऊन जन्मशताब्दी वर्षानिमित्त गदिमांचे मूळ गावी माडगुळे येथे गदिमांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. याची मुख्यमंत्री फडवणीस यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही गतिमान केली आहे. स्मारक उभारण्यासाठी माडगुळे येथे शासकीय जागा उपलब्ध आहे का ?, याची माहिती घेण्याचे आणि पाहणी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. मंत्रालयातील कार्यासन अधिकारी अतुल गुरव यांनी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना हे आदेश दिले आहेत. पुणे बांधकाम विभागाने एक जानेवारीला आटपाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला हे आदेश दिले असून बांधकाम विभागाने तहसीलदारांकडे पत्रव्यवहार करून जागा उपलब्ध असल्याची माहिती मागविली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. सध्या जागा मिळवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.  

गदिमाचे स्मारक माडगुळे येथे उभारण्यासाठी जागेची माहिती सरकारने मागविला आहे. स्मारकासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. -अमरसिंह देशमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com