पक्षादेशानेच काम करू - संजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य  संस्था मतदारसंघात भाजपचा अधिकृत उमेदवार पक्षाचे संख्याबळ पाहून मागे घेतला. पक्षाच्या आदेशानुसारच  ते केले. किंग नसलो तरी किंगमेकर ठरू. पण कुणाला मदत करायची याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला  जाणार आहे. त्याबाबत अद्याप काही सूचना नाहीत. पक्ष जो आदेश देईल तो आम्ही पाळू, असे प्रतिपादन  खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत साडेचार किलोमीटरचा कालवा काढून दुधेभावी तलाव आणि घोरपडी तलाव जोडले आहेत. यामुळे जत तालुक्‍यातील बेवनूरपर्यंत पाणी देण्यात येणार आहे. टेंभूचे पाणी दुधेभावी तलावात सोडण्यात आले आहे. त्यातून घोरपडी, निमज, शिंदेवाडी आदी सुमारे २५ गावांना  याचा फायदा होणार असल्याची माहिती देऊन खासदार संजय पाटील म्हणाले, ‘‘दुधेवाडी तलावात दुसऱ्यांदा पाणी सोडले आहे. बाणूरगडच्या बोगद्याचे काम पूर्ण करून उन्हाळ्यात प्रथम पाणी सोडले. या पाण्याच्या शेतीसाठी पिण्यासाठी उपयोग होईल. त्यामुळे या भागातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. सध्या सोडण्यात आलेले पाणी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत होते.  मात्र ते १० नोव्हेंबरपर्यंत सोडण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याने त्यांनी तशा सूचना दिल्या आहेत. 

ढालगाव वितरिकेचे काम सुरू असून सहा महिन्यांत ते पूर्ण होईल. त्यामुळे करलहट्टीपर्यंत पाणी देता येईल. म्हैसाळच्या थकीत वीजबिलाचा प्रश्‍न आहे. तरीही शासनाकडून काही पैसे देऊन योजनेचे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

Web Title: work will be party order by sanjay patil