फलटणमध्ये शेतकऱ्यांसाठी हुमणीकिड नियंत्रण विषयावर कार्यक्रम

phaltan.
phaltan.

फलटण (सातारा) - हुमणीचा जीवनक्रम व नियंत्रणासाठी योग्य उपाययोजनांसह प्रभावी किडनियंत्रणसाठी योग्य किडकनाशक वापरल्यास हुमणीवर नियंत्रण सहज शक्य असल्याचे कृषि महाविद्यालय कोल्हापूरचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितले. 

पवारवाडी (ता.फलटण) येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत हुमणीकिड नियंत्रण विषयावर कार्यक्रम आयोजन केले होते. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी गोरखनाथ डोईफोडे यांची उपस्थिती होती. संपुर्ण महाराष्ट्रभर हुमणीचे प्रादुर्भाव आहे. हुमणीचे दोन प्रकार असुन तसेच त्याचे जीवनक्रम व हुमणी किड पिकाच्या कोणत्या भागत राहून काम करते त्यानुसार उपाययोजना करता येतात. शेताच्या कडेला असलेल्या झाडावर हुमणीचे भूगेरे संध्याकाळी ६.४५ ते १०.००वाजता झाडाची कवळी शेंड्यावरील पाने खातात त्यामुळे  कीटकनाशके झाडावर फवारणी या किडीचे नियंत्रण होईल. हुमणी ग्रस्त क्षेत्र मध्ये पिकाला खते देताना  किटकनाश मिसळून द्यावे. जास्त पाण्यात हुमणी टिकत नाही तर  ट्रॅक्टरने नांगरट सकाळी किंवा संध्याकाळी करावीत त्यामुळे ८ ते१० टक्के किड नियंत्रण होते कारण पक्षी किडे वेचून खातात. लहान उसाला पाणी देऊन त्यामध्ये कीटकनाशकाचे ड्रेचीन करणे व मोठया उसामध्ये पहारीच्या साह्याने खड्डे  घेऊन  कीटकनाशक वापरल्यास हुमणी कीड पर्यत पोहचत असल्याने नियंत्रण करणे सोपे होणार आहे.  हुमणी किड नियंत्रण रासायनिक पध्दतीने व जैविकपध्दतीने कश्या दोन्ही प्रकारे करता येते. यावेळी शेतकऱ्यांनी काही प्रश विचारले त्या प्रश्नाचे सविस्तर माहिती डॉ. पाडुरंग मोहिते यांनी सांगितले . यावेळी  हुमणी नियंत्रण  कार्यक्रमाच्या माध्यमातून  पिकाचे होणारे नुकसान यामुळे नियंत्रण होण्यास मदत होणार असल्याचे गोरखनाथ डोईफोडे यांनी सांगितले . किड रोग सर्वेक्षण  व सल्ला प्रकल्प क्रॉपसँप सन २०१८-२०१९ च्या माध्यमातून किडरोग नियंत्रण चे काम चालु असल्याचे यावेळी प्रकाश सुर्यवंशी यांनी सांगितले .

यावेळी मंडळ कृषि अधिकारी दिलीप गोलांडे, तानाजी चोपडे, शिरीष भुंजे, लालासो शिंदे विश्वास खिलारे, कृषि पर्यवेक्षक धेर्यशील सावंत पाटील, सचिन जाधव, चंद्रकांत भोसले, कृषि सहायक व कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच राजाळे,सरडे,मठाचिवाडी, आसु, पवारवाडी गोखळी, खटकेवस्ती हंमतवाडी जाधववाडी  इतर  परिसरातील शेतकरी व ग्रामीण कृषि कार्यअनुभवचे विध्यार्थी उपस्थित होते. प्रमोद गाडे सूत्रसंचालन केले . कार्यक्रमाचे  आभार गोरखनाथ डोईफोडे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com