ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर घटतोय

विशाल पाटील
बुधवार, 11 जुलै 2018

सातारा - लोकसंख्या वाढ जगापुढे समस्या उभी राहिली असताना सातारा जिल्ह्यात मात्र लोकसंख्या वाढीचा दर प्रत्येक जनगणनेला घटत आहे. १९६१ मध्ये झालेल्या जनगणनेवेळी वार्षिक चक्रवाढ वृद्धिदर हा १.९८ होता. त्यावरून तो २०११ मध्ये ०.६७ वर आला आहे. दुसरीकडे मात्र, शहरी भागात राहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

सातारा शहर व परिसरातील खेड, करंजे तर्फ सातारा, गोडोली, कोडोली येथील लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक वृद्धिदर वेगाने वाढत आहे. 

लोकसंख्या वाढत असल्याने नवनवीन समस्या उद्‌भवत आहेत. त्यामध्ये शहरीकरणाचा वाढता वेग, बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा वानवा या समस्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी, तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याने शहरांत राहण्यास येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. सातारा जिल्ह्यातही ग्रामीण भागांतील लोकसंख्या कमी होत असून, शहरांत वाढत आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार शहरी भागाचा वार्षिक चक्रवाढ वृद्धिदर -०.१२ होता. पुढे १९७१ मध्ये ३.६७, १९८१ मध्ये १.५८, १९९१ मध्ये १.७४, २००१ मध्ये २.३४, तर २०११ मध्ये तो ३.६६ इतका वाढला आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागाचा कमी कमी होत 
आहे. 

जिल्ह्याचे ग्रामीण क्षेत्रफळ दहा हजार ४४ चौरस किलोमीटर इतके असून, त्यात २५ लाख २५ हजार ५४६, तर ४३५ चौरस किलोमीटर इतके शहरी भागाचे क्षेत्रफळ असून, त्यात सहा लाख ३० हजार ४१२ इतकी लोक राहतात. शहरी भागात १२ हजार ५४५ (२६.२३ टक्‍के), तर ग्रामीण भागात ८३ हजार ०१६ (१५.९७ टक्‍के) कुटुंबे दारिद्य्ररेषेखाली आहेत. 

शहरांतील लोकसंख्या वाढीचा दर (टक्‍के) - सातारा ११.२, फलटण २.६, कऱ्हाड -४.१, महाबळेश्‍वर ५.२, पाचगणी १२.२, म्हसवड १७.७, मलकापूर ४१.४, खेड १७.२, कोडोली ५९.०, करंजे तर्फे सातारा ३५.५, गोडोली ३४.४, कोरेगाव १०.३, रहिमतपूर ६.५, मेढा १२.५, पाटण १८.८, सैदापूर (कऱ्हाड) ३६.७, कऱ्हाड (ग्रामीण) ३५.० एकूण नागरी १६.२.-

Web Title: World Population Day Special rural population rate decrease