कुस्तीच्या मैदानात जखमी झालेल्या निलेशचे अखेर निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कऱ्हाड : बांदिवडे (जि. कोल्हापूर) येथे कुस्ती खेळताना मानेला दुखापत होवून गंभीर जखमी झालेला मल्ल निलेश कुरूंदकरचे पहाटे निधन झाले. मल्ल निलेश कंदुरकरवर उपचार सुरू असताना पहाटे त्याने अंतीम श्वास घेतला. निलेश कुरूंदकरला मुंबई येथे हलवण्यात येत होते. महामार्गावर रस्त्यावर त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

जोतिबा यात्रेनिमित्त शाहूवाडी तालुक्यातील बांदवडे इथे भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी इथला निलेश विठ्ठल कंदूरकर हा कुस्ती खेळत होता. प्रतिस्पर्धा मल्लानं टाकलेल्या एकचक्री डावातून सहीसलामत निसटण्यासाठी निलेश जोरदार प्रयत्न करताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो मैदानात कोसळला होता. आयोजकांनी धाव घेवून, निलेशला तत्काळ कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज पहाटे निलेशने अंतिम श्वास घेतला. 

Web Title: wrestler nilesh kundarkar died at kolhapur