अक्कलकोटच्या महासोमयागाची समाप्ती

अक्कलकोटच्या महासोमयागाची समाप्ती

अक्कलकोट : कुरनुर धरणावर आज झालेल्या अवभृत स्नानाने आणि शेवटी शिवपूरीत उदयनीय इष्टी हा शेवटचा धार्मिक विधी पूर्ण करून गेल्या सहा दिवसापासून शिवपूरीत सुरू असलेल्या महासोमयाग सोहळ्याची सांगता करण्यात आली. 

या सोहळ्यातील यज्ञाविधीसाठी बनविलेल्या नवीन पात्रांचे विधिवत पूजन करून मंत्रोपचारात बोरी नदीत विसर्जन करण्यात आले. यानंतर श्री गजानन महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर यजमान विकास आपटे यांना अभ्यंगस्नान घालण्यात आले आणि इतर सर्वांचे पवित्र धार्मिक विधी आणि मंत्रोपचारात सर्वांचे स्नान झाले. वरुण इष्टी आणि हवन विधी करण्यात आला. 

यावेळी श्रीनिवास श्रोत्री,विकास आपटे,प्रभाकर जोगळेकर,वासुदेव जोगळेकर,आनंद सामवेदी व इतर 35 ब्रम्हवृन्दासह डॉ पुरुषोत्तम राजीमवाले,डॉ गिरीजा राजीमवाले, सुधीर कुलकर्णी, एस के कुलकर्णी,आनंद ब्रम्हे, डॉ गणेश थिटे,प्रसाद रांगणेकर,वक्रतुंड औरंगाबादकर, पवन कुलकर्णी,निमेष गांधी,मोहन डांगरे, योगेश डांगरे,नितीन शिंदे, अजय फडतरे,शरयू खेर,शर्मिला ब्रम्हे,शर्मिला पेंडसे,प्रीती जोशी,वीणा दंडवते,सुमन मुळे, स्मिता जोशी, कुमार खराडे,योगेश महिंद्रकर ,विनोद मोरे,दत्ता वालेकर,यासह शिवपुरी संस्थान अधिकारी,कर्मचारी यांच्यासह भाविक उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com