चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज पहाटे हृद्‌यविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज पहाटे हृद्‌यविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.

चित्रमहर्षी भालजी पेढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयप्रभा स्टुडिओमध्ये त्यांनी कामाला प्रारंभ केला. घे भरारी, पैज लग्नाची, राजा पंढरीचा, राजमाता जिजाऊ, हायकमांड आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मला भेटलेली मोठी माणसे, पडद्या मागचा सिनेमा, लामन दिवा आदी त्यांची पुस्तके वाचक प्रिय ठरली. जयप्रभा स्टुडीओ बचाओ याच बरोबर सध्या सुरु असलेल्या शालिनी सिनेस्टोन वाचवा या आंदोलनात त्यांनी सक्रिय पुढाकार घेतला. रंकाळा संवर्धन मोहिमेतही ते सतत अग्रभागी असत. संस्कार भारती माध्यमातूनही त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांना पदभ्रमंतीचाही शौक होता. वीर शिवा काशिद व बाजीप्रभु देशपांडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी पन्हाळा -पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.  

 
 

Web Title: Yashwant Bhalkar no more