येडूर : कृष्णा नदीत अज्ञात महिलेचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women woman
येडूर : कृष्णा नदीत अज्ञात महिलेचा मृतदेह

येडूर : कृष्णा नदीत अज्ञात महिलेचा मृतदेह

मांजरी: चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात कृष्णा नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह मंगळवारी (ता. १५) आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: कलापूरच्या ५२ विद्यार्थ्यांच्या कलाकृती राज्य प्रदर्शनात

या महिलेची बॅग आणि चप्पला नदीच्या काठावर आहेत. त्यामुळे तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही जणांनी सोमवारी (ता. १४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या महिलेला नदीच्या काठावर बसल्याचे पाहिले होते, असे सांगण्यात आले. अंकली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिस तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

Web Title: Yeddur Body Unknown Woman Krishna River

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top