राजकारण अन्‌ समाजकारणावर तरुणाई व्यक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

‘यिन’च्या निवडी उत्साहात; जिल्हाध्यक्षपदी गोटे तर उपाध्यक्षपदी शर्मा

सोलापूर - राजकारण, तंत्रज्ञान, सोशल मीडिया, देशभक्ती, राष्ट्रनिर्माण, दहशतवाद आदी अनेक विषयांवर तरुणाईच्या वक्तृत्वाचा आविष्कार दिसून आला. निमित्त होते ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीचे. 

‘सकाळ’ कार्यालयात बुधवारी झालेल्या या कार्यक्रमातून जिल्हाध्यक्षपदी सोलापुरातील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रसाद गोटे यांची निवड झाली तर, उपाध्यक्षपदी पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालयाच्या गोविंद शर्मा यांची बिनविरोध निवड झाली.

व्यासपीठावर ‘यिन’ निवडणूक मार्गदर्शक अनिल विपत, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे उपस्थित होते. प्रारंभी निवडणूक प्रक्रियेची माहिती युनिट मॅनेजर किसन दाडगे यांनी दिली. तसेच सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर वक्तृत्व परिचयाचे सत्र झाले. प्रत्येक उमेदवाराला विविध विषय देण्यात आले होते. यात सोशल मीडिया लाभदायी आहे का? तरुणांनी राजकारणात यावे का? भारत महासत्ता होईल का? राष्ट्रनिर्माणात युवकांचे योगदान काय? देशभक्ती म्हणजे काय? दहशतवादाचा सामना कसा करता येईल? अशा विषयांचा समावेश होता.

वक्तृत्व परिचय सत्रानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. सामाजिक प्रश्‍नांवर आधारित या परीक्षेनंतर श्री. विपत, श्री. दिवाणजी, श्री. दाडगे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी चार अंतिम उमेदवारांची निवड करण्यात आली. यानंतर अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. त्यांना उर्वरित प्रतिनिधींनी मतदान केले. यातून जिल्हाध्यक्षपदी सोलापुरातील कॉलेज ऑफ फार्मसीचे श्री. गोटे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालयाचे श्री. शर्मा यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘यिन’ने राबविलेली निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक होती. पूर्ण प्रक्रियेअंती जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. या व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्याची चांगली संधी मला मिळणार आहे. माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व इतर महाविद्यालयाच्या ‘यिन’ प्रतिनिधींचा मी आभारी आहे.
- प्रसाद गोटे, यिन जिल्हाध्यक्ष, कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर
 
‘यिन’च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने मी खूप आनंदी आहे. या पुढील वाटचालीमध्ये सर्व महाविद्यालयातील यिन प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यास मदत मिळेल. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, प्रवेश यासारख्या अडचणी प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- गोविंद शर्मा, यिन उपाध्यक्ष, कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालय, पंढरपूर

Web Title: yin election in solapur

टॅग्स