"यिन समर यूथ समिट'चे मंगळवारपासून आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

कोल्हापूर - "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-"यिन' या व्यासपीठाच्या माध्यमातून मंगळवार (ता. 23) पासून स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत "यिन समर यूथ समिट'चे आयोजन केले आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनात सलग तीन दिवसांचे हे शिबिर असेल. शिबिरात सहभागासाठी तरूणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. इच्छुकांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन "यिन' परिवाराने केले आहे.

कोल्हापूर - "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-"यिन' या व्यासपीठाच्या माध्यमातून मंगळवार (ता. 23) पासून स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत "यिन समर यूथ समिट'चे आयोजन केले आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनात सलग तीन दिवसांचे हे शिबिर असेल. शिबिरात सहभागासाठी तरूणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. इच्छुकांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन "यिन' परिवाराने केले आहे. दरम्यान, नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आणि विद्याप्रबोधिनी  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे. 

तरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी "यिन' राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहे. यंदाच्या समर यूथ समिटमध्ये राज्यातील तज्ज्ञ मंडळी तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्थेसह तीन दिवसांत जेवण, शिबिर किट, बॅच आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत शिबिर होईल. सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रेटींशी संवाद, डिजिटल व ऑनलाइन मार्केटिंग आणि सायबर क्राइम, ऑनलाइन बॅंकिंग, स्टार्टअप- द नेक्‍स्ट बिग थिंग, इमेज बिल्डिंग, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद, क्रीडा व करिअरविषयी मार्गदर्शन, प्रेझेंटेशन स्किल्स अशा विविध विषयांवर विविध सत्र होतील. यात देश-विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शक तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यातून प्रत्येकाला नवी प्रेरणा आणि दिशा मिळणार आहे. सहभागासाठी "यिन' सदस्यांना शंभर रुपये आणि इतर विद्यार्थ्यांना तीनशे रुपये प्रवेश शुल्क असेल. चला तर मग आजच नोंदणी करू या...! 

(अधिक माहितीसाठी संपर्क- सूरज- 9970876972, सुशांत- 8888166114.) 

मार्गदर्शक वक्ते असे 
- उद्योजक जयसिंह चौहान, शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, याहूज्‌ डिजीटल मार्केटींगचे संस्थापक सूजय खांडगे, नीलय मेहता, विटो अल्बट्रो, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे सुनील पाटील, प्रसिध्द जाहिरातकार अनंत खासबारदार, मानसोपचार तज्ञ संतोष इंगळे, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्‍मा माने, प्रसिध्द दुर्गअभ्यासक डॉ. अमर अडके. 

Web Title: yin summer yotuh