चला, सारे योग शिकूया..!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

सांगली - आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे मोफत योगशिबिर आयोजित करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून चार दिवस हे शिबिर सांगलीसह कुपवाड, मिरज शहरात होणार आहे. यासाठी रोटरी क्‍लब ऑफ सांगली, सूरज फौंडेशन (कुपवाड), श्रीराम हॉल (मिरज), विजयसिंहराजे पटवर्धन दरबार हॉल योग केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. हे शिबिर सर्वांसाठी खुले असेल.

सकाळ माध्यम समूहातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या तीन वर्षांपासून हे योग शिबिर आयोजित करण्यात येते. यंदा याची व्याप्ती वाढवण्यात आली असून तिन्ही शहरांत हे शिबिर होणार आहे. शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी निवडक आसने प्राणायाम आदी योगाच्या विविध प्रकारांची माहिती शिबिरात देण्यात येणार आहे. योग विशारद बाळकृष्ण चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षक शिबिरात प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. या शिबिरात शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी निवडक आसने, प्राणायाम, क्रिया शिथिलीकरण, ध्यान धारणा, अध्यात्म साधना यांचा सहभाग आहे. या शिबिरात शहर परिसरातील संघटना, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी शिबिर...
निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचे असल्याचे हजारो वर्षांपासून सांगितले आहे. योगामुळे विविध आजारांवर मात करता येते. मानवी शरीरात प्रभावी अशी स्वयं उपचार शक्ती आहे. रोग प्रतिबंधक यंत्रणा आहे, मात्र ही शक्ती टिकवण्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा आहे. यामुळे शरीरातील अवयवांची कार्यक्षमता वाढवून रक्तदाब, मधुमेह, हृदयाचा आघात कमी करता येतात. मज्जासंस्थेत संतुलन येते. 

दृष्टिक्षेपात
 सांगली : रोटरी क्‍लब हॉल, गणेशनगर. 
 कुपवाड : नव कृष्णा व्हॅली स्कूलचे क्रीडांगण.
 मिरज : श्रीराम हॉल, ब्राह्मणपुरी. 
 वेळ : सकाळी साडेसहा ते साडेसात 
 तारीख : १८ ते २१ जून 
 अधिक माहितीसाठी ः 
रवींद्र डुबल (९८९०८२८६०४)

Web Title: yoga Camp by Sakal