esakal | आरोग्यवर्धिनी केंद्रांतून आता योगाचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga lessons wiil be given at aaroghyawardhini center

केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्यवर्धिनी आरोग्यसेवा सुरू केली. खेड्यापाड्यांतील जनतेची आरोग्यासाठी होणारी ओढाताण व कुचंबणा थांबविण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. त्या अंतर्गत लोकांना 13 सेवा देण्यात येणार आहेत.

आरोग्यवर्धिनी केंद्रांतून आता योगाचे धडे

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर : जिल्ह्यातील 555 आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये लवकरच योगवर्ग सुरू होणार आहेत. त्याचा प्रारंभ पारनेरमधून झाला असून, तालुक्‍यातील 35 ठिकाणी हे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यांपैकी 20 केंद्रांमध्ये सुरवात झाली आहे. 

जाणून घ्या- नाही खर्चिली कवडी दमडी 

केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्यवर्धिनी आरोग्यसेवा सुरू केली. खेड्यापाड्यांतील जनतेची आरोग्यासाठी होणारी ओढाताण व कुचंबणा थांबविण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. त्या अंतर्गत लोकांना 13 सेवा देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रात किमान एका डॉक्‍टराची करार पद्धतीने नेमणूक केली आहे. त्यांना प्रशिक्षणही दिले आहे. 

दरमहा चार योगवर्ग

आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरवात पारनेर तालुक्‍यातून झाली. त्याअंतर्गतच 13 आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. त्यातच योगवर्गाचाही समावेश आहे. त्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात आठवड्यातून एक दिवस, असे दरमहा चार योगवर्ग घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षित योगशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. एका योगवर्गासाठी शिक्षकास 500 रुपये दिले जाणार आहेत. योगशिक्षकास एका दिवसात फक्त दोनच केंद्रांवर असे वर्ग घेता येतील. 

प्रशिक्षकांची नेमणूक

पारनेर तालुक्‍यात काही ठिकाणी अशा शिक्षकांची नेमणूकही केली आहे. काही ठिकाणी नव्याने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातही येत्या काही महिन्यांत सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रांवर योगशिक्षकांची नेमणूक करून योगवर्ग सुरू होणार आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्रात रक्तदाब, मधुमेह, कर्करोगासारख्या आजारांसोबतच इतरही 13 सेवा देण्यात येणार आहेत. त्यात योगवर्गाचाही समावेश असून, त्यात 30 वर्षांवरील स्त्री-पुरुषांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. 

हेही वाचा- कर्मचाऱ्यांची खेचाखेची; दमछाक भाविकांची

व्यायामाचीही नितांत गरज

लोकांच्या आरोग्याचा विचार करता, ग्रामीण भागातही ताणतणावाचे जीवन सुरू झाले आहे. औषधोपचाराबरोबरच मानसिक उपचाराचीही मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. तसेच, व्यायामाचीही नितांत गरज असल्याने, आता आरोग्यवर्धिनी केंद्रांतही योगवर्ग सुरू करण्यात येणार आहेत. 
- डॉ. प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर