esakal | नाही खर्चली कवडी दमडी... 
sakal

बोलून बातमी शोधा

Instruction to spend the funds before March

अखर्चित निधीत सगळ्याच विभागांच्या योजनांचा समावेश आहे. निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय पातळीवरील कामकाजामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. हा अखर्चित निधी खर्च करण्यासाठी आता दोनच महिन्यांचा कालावधी आहे.

नाही खर्चली कवडी दमडी... 

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना प्राप्त झालेल्या निधीपैकी तब्बल 180 कोटींचा निधी अखर्चित राहिला. तो मार्चअखेर खर्च करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांनी दिले. 

हेही वाचा- ते चीनमधून परतले

अखर्चित निधीत सगळ्याच विभागांच्या योजनांचा समावेश आहे. निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय पातळीवरील कामकाजामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. हा अखर्चित निधी खर्च करण्यासाठी आता दोनच महिन्यांचा कालावधी आहे. याआधी नोव्हेंबरमधील अखर्चित रक्कम 205 कोटी होती. त्यानंतर दोन महिन्यांत केवळ 25 कोटी रुपये खर्च झाले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेला निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित आहे. त्यामुळे हा कोट्यवधींचा निधी परत जाण्याची शक्‍यता आहे. 

ठेकेदारांनाही कारवाईचा इशारा

या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर आज जिल्हा परिषद अध्यक्ष घुले यांनी आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते. अखर्चित निधी विकासकामांवर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, यात कुचराई केल्यास संबंधित अधिकारी- ठेकेदारांनाही कारवाईचाही इशारा दिला आहे. 

जाणून घ्या- हे थ्रील अनुभवा

विभागनिहाय शिल्लक निधी

शिक्षण पाच कोटी 21 लाख
आरोग्य 15 कोटी 67 लाख
महिला-बालकल्याण आठ कोटी
कृषी चार कोटी 24 लाख
लघुपाटबंधारे दहा कोटी 22 लाख
ग्रामीण पाणीपुरवठा 32 कोटी 18 लाख
बांधकाम (दक्षिण) 20 कोटी
बांधकाम (उत्तर) 13 कोटी 78 लाख
पशुसंवर्धन तीन कोटी 22 लाख
समाजकल्याण 62 कोटी 14 लाख
ग्रामपंचायत चार कोटी 65 लाख
loading image