esakal | खेचाखेची कर्मचाऱ्यांची; दमछाक साईभक्तांची
sakal

बोलून बातमी शोधा

sai devotees facing the problem due to the staff

साई संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनीही भाविक या नात्याने येथे हा अनुभव घेतला होता. मात्र, कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनाही हा प्रकार थांबविता आला नाही.

खेचाखेची कर्मचाऱ्यांची; दमछाक साईभक्तांची

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी : भाविकांना रांगेत तिष्ठत राहावे लागू नये, यासाठी गर्दीच्या वेळी साईसमाधीला काच लावून दुरून दर्शनाचा पर्याय वापरला जातो. मात्र, बऱ्याच वेळा दर्शनबारी मोकळी आणि साईसमाधीला काच लावून भाविकांना दर्शन घेण्याची घाई केली जाते. या कर्मचाऱ्यांमुळे साईमंदिरात गोंगाट होतो. ते भाविकांना मागे-पुढे खेचणेच, जणू आपले काम असल्याचे समजतात. साईसमाधीला गरज नसताना काच लावणे, मंदिरात गोंगाट, खेचाखेची कधी थांबणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

हेही वाचा- नाही खर्चिली कवडी दमडी 

साई संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनीही भाविक या नात्याने येथे हा अनुभव घेतला होता. मात्र, कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनाही हा प्रकार थांबविता आला नाही. गेल्या सोमवारी (ता. 27) दर्शनबारी मोकळी आणि साईसमाधीवर काच लावून कमी संख्येने असलेल्या भाविकांना घाईने दर्शनाचा आग्रह होत होता. दर्शनरांग विरळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर घाईने काच दूर करून भाविकांची एकेरी रांग सुरळीत करण्यात आली. 

काच काढण्याबाबत बेफिकिरी

सलग सुट्या असल्या, की येथे भाविकांची गर्दी होते. दर्शनबारीचे चारही कक्ष भरतात. रांग बाहेर जाते. अशा वेळी साईसमाधीला काच लावली जाते. भाविक दुरून दर्शन घेतात. त्यामुळे वेळेची बचत होते आणि अधिक भाविकांना दर्शन घेणे शक्‍य होते. दर्शनबारीच्या कक्षात किती गर्दी आहे, काच लावायची की नाही, याचा निर्णय साई संस्थानचा सुरक्षा विभाग घेतो. त्यासाठी "वॉकी टॉकी'ची सुविधा दिली आहे. टीव्ही स्क्रिनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे दर्शनबारीचे दृश्‍य दिसते, तरी साईसमाधीला काच लावण्या व काढण्याबाबत बऱ्याचदा बेफिकिरी दाखविली जाते. 

अवश्‍य वाचा- शालेय पोषण आहार चुलीवरच 

पत्रकारांकडून तक्रार

गेल्या सोमवारी (ता. 27) साईमंदिरातील दर्शनरांग विरळ झाली. दर्शनबारीतील कक्ष रिकामे असतानाही, साईसमाधीला काच लावून भाविकांना पुढे जाण्यासाठी कर्मचारी गोंगाट करीत होते. रांग संपल्याचे लक्षात येताच, मग घाईने काच काढून एकेरी रांग करण्यात आली. त्यानंतर लगेच काही पत्रकारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांचे याकडे लक्ष वेधले. त्यांनी आपण यात लक्ष घालू, असे सांगितले. प्रत्यक्षात परिस्थिती कायम आहे.

शिल्पा शेट्टीसाठी रांग खोळंबली

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या साईदर्शनासाठी काही काळ दर्शनरांग बंद करण्यात आली. ती साईंची पाद्यपूजा करीत होती, त्या वेळी सोबत असलेली तिची भगिनी स्वतःचा मोबाईल पॉवर बॅंक घेऊन चार्ज करण्यात मश्‍गूल होती. त्यांचे दर्शन आटोपताच खोळंबलेल्या रांगेतील भाविकांना पुढे रेटण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुन्हा गोंगाट आणि खेचाखेची सुरू केली. 

loading image