“Bhilwadi-Ashta Road Fatality: आष्टा रस्त्यावरील अंकलखोप येथील अमर पाटील यांच्या गोठ्यानजीक अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडला. त्याच्या डोके, तोंडाला गंभीर दुखापत झाली. सकाळी अमर पाटील यांनी अपघाताची माहिती नातेवाइकांना दिली.
भिलवडी : आष्टा-भिलवडी मार्गावर अंकलखोपनजीक शनिवारी (ता. १५) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. कुलदीप विक्रम मोकाशी (वय ३३, भिलवडी) असे मृताचे नाव आहे.