लग्नास आड येणाऱ्या तरुणाचा खून 

A young boy was murdered in Solapur
A young boy was murdered in Solapur

सोलापूर : लग्नास आड येणाऱ्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. मोहम्मदहुसेन इब्राहिम कुमठे (वय 25, रा. शास्त्रीनगर, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात घडली. या प्रकरणात एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

निजाम जहिरुद्दीन उस्ताद (रा. शास्त्रीनगर, सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. निजाम याचे एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. त्या तरुणीने निजामसोबत लग्न करू नये म्हणून मोहम्मदहुसेन हा तिला नेहमी भडकावत होता. याच कारणावरून सोमवारी सायंकाळी निजाम याने मोहम्मदहुसेन यास आपण दोघे फिरायला जाऊ असे म्हणून जिल्हा क्रीडा संकुल परिसरात नेले. तिथे अंधारात तलवारीने वार करून मोहम्मदहुसेन याचा खून केला, अशी माहिती पोलिस उपायुक्त एम. बी. गायकवाड यांनी दिली. 

दरम्यान, खून केल्यानंतर निजाम हा तेथून निघून गेला. घटनेची माहिती कळताच सदर बझार पोलिसांचे पथक दाखल झाले. पोलिस उपायुक्त एम. बी. गायकवाड, सहायक आयुक्‍त महावीर सकळे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपीच्या तपासाकरिता पोलिसांची पाच पथके लागलीच रवाना झाला. तासाभरात पोलिसांनी निजाम यास ताब्यात घेतले. 

दोघेही मजुरी काम करतात. इब्राहिम हा गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी येथे कामाला होता. भावाच्या साखरपुड्यासाठी तो सोलापुरात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com