घरातुन निघुन आलेला अल्पवयीन मुलगा सुखरूप घरी

चंद्रकांत देवकते
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) - वाहन चालकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे घरातुन निघुन गेलेल्या अल्पवयीन मुलाला पुन्हा त्यांच्या आईवडीलाकडे सुखरूप पोहचविण्याची महत्वपुर्ण कामगिरी मोहोळ पोलिस स्टेशनचे नुतन पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी पार पाडली.         

मोहोळ (सोलापूर) - वाहन चालकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे घरातुन निघुन गेलेल्या अल्पवयीन मुलाला पुन्हा त्यांच्या आईवडीलाकडे सुखरूप पोहचविण्याची महत्वपुर्ण कामगिरी मोहोळ पोलिस स्टेशनचे नुतन पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी पार पाडली.         

याबाबत पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ  येथील हायवेवरील उड्डानपुलावर रविवार ता .१२ रोजी रात्रो ८. वाजता एक शालेय गणवेशावरील विद्यार्थी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना हात करीत असल्याचे वाहनधारक प्रकाश पांडुरंग साठे रा. नरखेड यांच्या निर्दशनास आले. साठे यांना या मुलांच्या अंगावरचा शाळेचा गणवेश पाहुन वेगळाच संशय आल्याने त्यांनी मुलाला विश्वासात घेत अधिक विचारपुस केल्यानंतर वडीलांनी मारल्यामुळे तो घरातुन रूसुन आल्याचे समजले. तात्काळ साठे यांनी या मुलास पोलिस स्टेशनमध्ये आणले.  त्यावेळी पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी संबधीत मुलांचे नातेवाईकांची फोन लावुन माहीती घेतली. नातेवाईकांना मुलगा मोहोळ येथे  आल्याची माहीती दिली. त्यावेळी नातेवाईक यांच्या कडुन माहीती घेतली असता हा मुलगा वांगी (उत्तर सोलापूर) येथील रहिवासी असलेचे समजले. वडीलांनी मारल्याने तो रागाच्या भरात पुणे येथे जात असल्याची माहीती समोर आली. 

यावेळी मुलाला पोलिसांकडे आणणारे प्रकाश पांडुरंग साठे  यांचा पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी हार घालुन सत्कार केला. याकामी पो.स.ई. अन्वय मुजावर, सलीम शेख, अे.एस.आय.विलास रणदिवे यांनी काम पाहीले. 

पो.नि. सुर्यकांत कोकणे म्हणाले की, समाजातील नागरीकांनी  या वाहनधारकाप्रमाणे जागृत राहील्यास व सहकार्य केल्यास अघटीत घटना घडणार नाहीत. तसेच पालकांनी ही आपल्या  मुलांवर अवास्तव अपेक्षेचे ओझे टाकु नये.  

Web Title: The young boy who had left his home safely at home