तरूण वर्ग सोशल मिडीयाच्या आहारी गेल्याने पालकवर्ग चिंतेत

अक्षय गुंड 
गुरुवार, 5 जुलै 2018

सध्याच्या स्थितीतील अर्धवट शिकलेल्यांना घरचे काम नको. शेतात जायला नको. आई-वडिलांनी काही काम सांगितले तर त्यांना उलट-सुलट उत्तरे देऊन त्यांच्यावरच रागवायचं. नुसतं दोन टाईम घरचे खायचे. गल्लीबोळात असलेल्या चौकातील पारावर बसुन व्हाॅट्सअॅप, फेसबुकवरून स्वतःच्या फोटोसह नेत्यांची फुकटची पब्लिसिटी करत. अख्खा दिवस सोशल मिडीयावर फेसबुक लाईक व कमेंट करण्यात धन्यता मानत असल्याने ग्रामीण भागातील पालकवर्ग चिंतेत असल्याचे दिसत आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर)- सध्याच्या स्थितीतील अर्धवट शिकलेल्यांना घरचे काम नको. शेतात जायला नको. आई-वडिलांनी काही काम सांगितले तर त्यांना उलट-सुलट उत्तरे देऊन त्यांच्यावरच रागवायचं. नुसतं दोन टाईम घरचे खायचे. गल्लीबोळात असलेल्या चौकातील पारावर बसुन व्हाॅट्सअॅप, फेसबुकवरून स्वतःच्या फोटोसह नेत्यांची फुकटची पब्लिसिटी करत. अख्खा दिवस सोशल मिडीयावर फेसबुक लाईक व कमेंट करण्यात धन्यता मानत असल्याने ग्रामीण भागातील पालकवर्ग चिंतेत असल्याचे दिसत आहे.

अलिकडच्या स्मार्ट जमान्यात अॅन्ड्राईड फोन आले. शहरीकरणाबरोबर ग्रामीण भागातील युवकही स्मार्ट झाला. शिक्षणांच्या कारणांने असो अथवा इतर मुलांच्या तुलनेत असो, पालकांनी मुलांना मोबाईल घेऊन दिले. मोबाईलचा चांगल्या प्रकारे कामापुरता वापर करून काही युवक उच्चस्तर पदावर रूजु झाले, तर काहींनी स्वतःचे वाटोळे करून घेतले. सोशल मिडीयाच्या प्रसिद्धीच्या नादात शिक्षणाला वाट लागली. एखाद्या नेत्यांचा कार्यकर्ता बनुन त्यांची मर्जी राखण्यासाठी दिवसभर त्यांचे फोटो सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्याचे कामात आजचा युवक इतका गुरफटलेला आहे. की या नादात त्याला आई-बाप रानात उन्हातान्हात, पाऊसपाण्यात शेतात कबाडष्ट करून आपले पालनपोषन करत असल्याचे भान विसरत चाललेला आहे.

युवक ज्यांच्या हाती या भारताचे व खऱ्या अर्थाने विश्वाचे भवितव्य आहे. या युवकांकडुन आपल्या राष्ट्राला प्रचंड अपेक्षा आहेत. तरूण, युवक, युवाशक्ती असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात. सामर्थ्यवान तडफदार उत्साहपूर् तेजस्वी बुद्धीने शक्तीने सर्वार्थाने शक्तिशाली कोणतीही जबाबदारी पार पडण्यास समर्थ असणारे अन् लाथ मारील तिथून पाणी काढील अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व याच युवकांसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. तरुणांमधेच वाढत असलेल्या बेकारी, गुन्हेगारी यांचे प्रमाण पाहता खरंच परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव होते. तंत्रज्ञान व इंटरनेट क्षेत्रातील वाढत्या संधी व विकासामुळे तरुणाई या क्षेत्रांकडे अधिक ओढावली. इंटरनेट म्हटलं की फेसबुक, व्हाॅट्सअॅप हे आलचं. मात्र या सर्वांना वापर करताना तरुणाईला कशाचंही भान राहत नाही.

दिवसातील बराच वेळ अशा गोष्टींतच वाया जातो. हाच तो युवक जो प्रचंड सामर्थ्यवान, उत्साही आहे, ज्याच्या मनगटात विश्व जिंकायची ताकद आहे. तोच युवक वाईट मार्गाला जाऊन या सर्व मायाजालात का गुंततो ? 

खुन्नस देणारे मेसेज
मोबाईलवर नेत्यांच्या वाढदिवसांचे पोस्टर बनवणे. तसेच इतरांना खुन्नस निर्माण होईल असे मेसेज तयार करून सोशल मिडीयावर व्हायरल करणे. यामधून आजचा युवक नेमके काय साध्य करत आहे. असा प्रश्न सर्वांना पडतोय. 

एक जीबी डाटाही पुरेना
पुर्वी महिन्याकाठी एक जीबी इंटरनेट डाटा मिळत असे. पण सध्या फोरजीच्या जमान्यात एक जीबी डाटा पुरत नसल्याने युवक किती सोशल मिडीयाच्या आहारी गेला आहे. हे दिसते. 

नेतेमडंळीचे खुळ तरूणाईला
२०१४ साली सोशल मिडीयाच्या व युवकांच्या जोरावर देशात नरेंद्र मोदी यांनी सत्ता काबीज केली. त्यामुळे आपला नेताही सोशल मिडीयाच्या प्रसिद्धीत मागे राहिला नाही पाहिजे आजच्या युवक कार्यकर्त्यांची आहे.

Web Title: For the young generation fad of social media tension become complacent for parents