किरकोळ घरगुती वादातून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

राहुरी (नगर) : कोंढवड येथे आज बुधवारी (ता.18) सकाळी साडेसहा वाजता एका तरुणाचा मृतदेह मुळा नदीपात्रातील पाण्यावर तरंगताना आढळला. घरातील किरकोळ वादातून रागाच्या भरात त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
 

राहुरी (नगर) : कोंढवड येथे आज बुधवारी (ता.18) सकाळी साडेसहा वाजता एका तरुणाचा मृतदेह मुळा नदीपात्रातील पाण्यावर तरंगताना आढळला. घरातील किरकोळ वादातून रागाच्या भरात त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

शुभम किशोर बनसोडे (वय : 20) असे मृताचे नाव आहे. शुभमचे मुळगांव सलाबतपूर (ता. नेवासा) असून, वडील वारल्यानंतर तो आई व बहिणीसह मामाच्या घरी शेजवळ कुटुंबात कोंढवड (ता. राहुरी) येथे राहत होता. तो राहुरी महाविद्यालयात बी. कॉम.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. परीक्षा फी भरण्यासाठी त्याने घरातून पैसे घेतले होते. परंतु गणेशोत्सव काळात तो कॉलेजला गेला नाही. दरम्यान, परीक्षा फी भरण्याची विहित मुदत संपल्याने, दंडाच्या रकमेसह त्याला परीक्षा फी भरावी लागली. त्यामुळे घरात किरकोळ वाद झाला होता. रागाच्या भरात तो सोमवारी (ता.16 ) घरातून निघून गेला होता. तेंव्हापासून त्याच्या शोध सुरु होता.

आज सकाळी साडेसहा वाजता शुभमचा मृतदेह मुळा नदीत पाण्यावर तरंगताना आढळला. पोलीस पाटील सदाशिव तागड यांनी राहुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. घटनास्थळी तलाठी वर्षा कातोरे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जायभाये व आदिनाथ पारखी यांनी पंचनामा केला. राहुरी पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide over minor domestic dispute