Divorce Case : घटस्फोटाच्या कारणातून तरुणाने कटरने स्वतःचा गळा कापून घेण्याचा केला प्रयत्न

नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Divorce Case Vita Police
Divorce Case Vita Policeesakal
Summary

जखमी कैलासचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. काल विटा येथे विटा - खानापूर रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास कौटुंबिक कारणातून वाद झाला.

विटा : येथे घटस्फोटाच्या (Divorce) कारणातून एका तरुणाने स्वतःचा गळा कटरने कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. कैलास अंकुश सकट (वय २८, वासुंबे, ता. खानापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. काल (मंगळवार) दुपारी सव्वादोनच्या सुमारास विटा-खानापूर रस्त्यावर (Vita-Khanapur Road) एका दवाखान्यामागे ही घटना घडली.

पोलिसांनी (Vita Police) नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी सांगली येथे खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. विटा पोलिस ठाण्यात रुग्णालयातून नोंद करण्यात आली आहे.

Divorce Case Vita Police
Konkan Politics : खेडमध्ये घोषणाबाजी करत रामदास कदमांबाबत वापरले अपशब्द; ठाकरे-शिंदे गटांत तणाव

पोलिसांनी सांगितले, की जखमी कैलासचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. काल विटा येथे विटा - खानापूर रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास कौटुंबिक कारणातून वाद झाला. या वादातून कैलास व अन्य एकाची मारामारी झाली. या वादातून त्याने पळत जाऊन खानापूर रस्त्यालगत असलेल्या एका दवाखान्याच्या मागे कटरने स्वतःचा गळा कापला.

Divorce Case Vita Police
Deepak Kesarkar : शिवसेनेला एक कोटी दिल्याचा माझ्याकडं पुरावा आहे; शिक्षणमंत्र्यांचा खळबळजनक दावा

जखमी अवस्थेत ओढ्याच्या पात्रात उडी मारली. नाल्यात जखमी अवस्थेत पडलेल्या त्या तरुणाला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी विटा येथे खासगी रुग्णालयात व तेथून सांगली येथे उपचाराला दाखल केले. दरम्यान, विटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये तरुणाला उपचारासाठी दाखल केल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com