- शरद जाधव
मिरज - येथील कृष्णा नदीत आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतलेल्या युवतीचा अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीव वाचला. कृष्णाघाट येथे नदीकाठावर कार्यरत असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना तरुणीने नदीत उडी घेतल्याचे लक्षात येताच यांत्रिक बोटीने तिथे जात तिला बाहेर काढण्यात यश आले. गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास हा प्रकार घडला.