शेवगावच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

-  शहरातील बापू घनवट (वय : ३२) या तरुणाचा दगडाने ठेचून खुन करण्यात आला. ही घटना आज गुरुवार (ता.८) सकाळी उघडकीस आली.

- शेवगाव - पाथर्डी रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर हा मृतदेह आढळून आला.

शेवगाव : शेवगाव - पाथर्डी रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर पालाच्या जवळ मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या जवळ दुचाकी, कंबरेचा बेल्ट, चष्मा, चप्पल आढळून आल्या. मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून छिन्नविच्छिन केला आहे. मृत्युचे कारण मात्र समजू शकले नाही. शहरातील सदगुरु झेराँक्स व कॉम्प्युटरचे मालक बापू घनवट (वय : ३२) या तरुणाचा दगडाने ठेचून खुन करण्यात आला. ही घटना आज गुरुवार (ता.८) सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी एक महिला व अन्य चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत डाँग स्काँडला पाचारण करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youngster of shevgav stabbed to death

टॅग्स