मेसेजला उत्तर न दिल्यास, तुझ्या संसाराची वाट लावतो..तरुणाची धमकी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

शिरोळ - येथील 24 वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून तू पूर्वीप्रमाणे माझ्या मेसेजला उत्तर दे, नाहीतर तुझ्या नवऱ्याला उलटसुलट सांगून, संसाराची वाट लावतो, अशी धमकी देणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत ऊर्फ संभाजी व्यंकटराव भोसले असे युवकाचे नाव आहे. 

म्हैसाळ (ता. मिरज) येथील विवाहिता नवशक्‍ती चौक शिरोळ येथे राहत आहे. संबंधित विवाहितेचे माहेर शिरोळ आहे. 23 जुलैला सायंकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित विवाहित आईच्या घरी गेल्यानंतर संभाजी भोसले यांनी तिला पूर्वीप्रमाणे माझ्या मेसेजला उत्तर का देत नाहीस, असा जाब विचारला. मेसेजला उत्तर नाही दिल्यास संसाराची वाट लावतो अशी धमकी दिली. मंगळवारी रात्री उशिरा शिरोळ पोलिस ठाण्यात संभाजी भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी भोसले याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youngster Threats married woman Crime case in Shirol