
मियावकी जंगल निर्मिती तीन ठिकाणी केली असून त्या माध्यमातून साडेतीन हजार पेक्षा जास्त स्थानिक देशी झाडांचे रोपण आणि संवर्धन केले जात आहे.
शिराळा (सांगली) : कोरोनाच्या हाहाकारात प्रत्येकजण आपला जीव कसा वाचवता येईल यासाठी धडपडत सुरू आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन करत आपल्या जीवाबरोबर मुक्या प्राणी, पशु-पक्षांचे, झाडांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणारी शिराळा येथील तरुणाईने स्थापन केलेली प्लॅनेट अर्थ फाउंडेशन ही संस्था व त्या संस्थेतर्फे सुरू असणारी वन्यजीव आपत्कालीन सेवा इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.
या आपत्कालीन सेवेमुळे जखमी अवस्थेत असणाऱ्या चाळीस पेक्षा जास्त वन्य जीवांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले. मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन सुरू झाला. रस्त्यावर असणारी माणसांची व वाहनांची वर्दळ थांबल्याने माणूस आणि वन्यप्राणी यांचे समोरा समोर येणे वाढले. कोरोनामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा आपल्या जीवाची बाजी लावत असताना आपला जीव वाचवण्या बरोबर मुक्या प्राण्यांचे, पक्षांचे, वनसंपदा वाचवण्यासाठी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनची वन्यजीव आपत्कालीन सेवा कार्यरत होती. यामार्फत ४० पेक्षा जास्त वन्यजीव वाचणवले.
हेही वाचा - काही विद्यार्थ्यांकडून निर्णयाचे स्वागत
यामध्ये विविध कारणांनी जखमी झालेल्या नाग ८ घोणस-४ मण्यार- २ तसेच इतर बिन विषारी साप, माकड ४ भटकी कुत्री, पक्षी अशा चाळीस पेक्षा जास्त पशु पक्षांना पशुसंवर्धन विभागामार्फत वन विभागाच्या देखरेखीखाली जीवदान मिळाले आहे. पक्षीनिरीक्षांचे काम सुरू आहे. शिराळा तालुक्यामत बिबट्याच्या सततच्या वावारामुळे लोकांच्यात भीती निर्माण झाली आहे. ही दूर करण्यासाठीमानव बिबट्या सहजीवन विषयक जनजागृती कार्यक्रम रवनविभाग व प्लॅनेट अर्थ च्या माध्यमातून सुरू केला आहे.
तालुक्यातील ९१ ग्रामपंचायत जनजागृती केली जाणार आहे. अडगळ व बांधकांस, अथवा रस्त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या वड, पिंपळ आशा विविध ५० पेक्षा जास्त झाडांचे प्रत्यारोपण केले आहे. मियावकी जंगल निर्मिती तीन ठिकाणी केली असून त्या माध्यमातून साडेतीन हजार पेक्षा जास्त स्थानिक देशी झाडांचे रोपण आणि संवर्धन केले जात आहे. अशा प्रकारे पशु पक्षी, पर्यावरण संवर्धन करणाऱ्या या संस्थेचा कार्य इतरांना नक्कीच
प्रेरणादायी आहे.
हेही वाचा - गेली 45 वर्ष जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ८० वर्षाचा शेतकरी फुलवतोय शेती
संपादन - स्नेहल कदम