कोल्हापूरातील तरूणास 26 लाखाचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अमिषाने तरुणाला महिलेसह दोघा भामट्यांनी तब्बल 26 लाखाचा गंडा घातला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद प्रविण गणपतराव पाटील (वय 38, रा. जिवबा नाना पार्क) यांनी दिली असून खुशी माहेश्‍वरी आणि श्री पाटील (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती, प्रविण पाटील हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. त्यांच्याशी खुशी माहेश्‍वरी नावाच्या महिलेने फोनवरून 13 एप्रिलला संपर्क साधला. तिने आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देते. नामवंत ट्रेड कंपन्याचे काम आपल्याकडे असल्याचे सांगितले. आपल्याकडे गुंतवणूक केल्यानंतर आपण खात्यावर 57 वेळा पैसे काढणे व भरण्याची सवलत (लिमिट) मिळून देऊ शकतो असे अमिष दाखवले. याकामासाठी तीने पाच हजार रूपये शुल्कही भरावे लागले असे सांगितले. त्याला प्रवीण पाटील हे बळी पडले. त्यांनी तिच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांच्या डी मॅट खात्यातून खुशीने 12 लाख रूपये शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने परस्पर काढून घेतले. यावरील पुढील पैसे काढण्याचे व्यवहार मेलद्वारे करा, असे तिने सांगितले. मात्र संबधित मेल प्रवीण पाटील यांना मिळत नव्हते. याबाबत त्यांनी फोनवरून खुशीकडे चौकशी केली. त्यावेळी तिने कंपनीचे मेल लॉक झाल्याचे सांगत कंपनीतील पाटील नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानेही त्यांना मेल लॉक असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर खुशी व पाटील या दोघांनी त्यांच्या डीमॅट खात्यावरील वेळोवेळी 26 लाख 19 हजाराची रक्कमही परस्पर काढून घेतली. 

Web Title: youth cheating incidence in Kolhapur