नोकरीसाठी सांगलीत तरूण चढला टाॅवरवर

नोकरीसाठी सांगलीत तरूण चढला टाॅवरवर

सांगली - नोकरीच्या मागणीसाठी तरुण दुसऱ्यांदा मोबाईलच्या टॉवरवर चढला. अनिल हणमंत कुंभार या युवकाचे नाव आहे. मनपा अग्निशामक विभागाने कुंभार याची सुटका केली. लष्करात नोकरी मिळण्याचे पत्र मिळावे यासाठी त्याने असे आंदोलन केल्याचे सांगितले.

याच मागणीसाठी अनिलने दहा दिवसापूर्वीही असेच आंदोलन केले होते. टॉवरवर चढून बसल्यामुळे पोलिसांची आणि अग्निशमन विभागाची तारांबळ उडाली.. मात्र त्याला खाली उतरवण्यात पोलिसांना आणि अग्निशमन विभागाला यश आले आहे.

अनिल हा वाळवा तालुक्यातील इटकरे गावामध्ये राहतो. त्याचे वडील हणमंत कुंभार हे आर्मीत नोकरीस होते. ते आता मयत झाले आहेत. वडीलांच्या जागेवर सैन्यदलात भरती करण्यात यावी यासाठी त्याने अनेक वेळा भरतीसाठी प्रयत्न सुद्धा केला. मात्र त्याला अपयश आहे. नोकरी मिळावी यासाठी तो सैनिक बोर्डामध्ये गेले 4 दिवसापासून फेऱ्या मारत होता. मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अनिल हा एमआयडीसीमध्ये काम करत शिक्षण घेत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com