कऱ्हाड: विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू
दिगंबर एकुलता मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, विवाहित बहीण असा परिवार आहे. वीजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी ठरणारी दोन वर्षातील चौथी घटना आहे, त्याचबरोबर सुमारे 15 उघडे फुज बॉक्स गेली कित्येक वर्षे आहेत. वारंवार तक्रार करूनही वीज कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
रेठरे बुद्रुक : वीजेच्या फुईज बॉक्समध्ये विजेचा प्रवाह सुरु करताना विजेचा जोराचा धक्का बसल्याने एकजण जागीच ठार झाला. दिगंबर सुरेश जगताप (वय 26) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. वडगाव हवेली येथे आज सकाळी दहाच्या सुमारास घटना घडली.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिगंबर यांची मोझीम नावाच्या शिवारात शेती आहे. तेथे तो सकाळी शेतात पिकाला पाणी पाजण्यास गेला होता. त्यावेळी खंडीत वीज प्रवाह सुरु झाल्यानंतर उघड्या फुझ बॉक्समध्ये तारांच्या गुंत्याने कुपनलिकेची वीज सुरु करताना दिगंबरचा प्रवाहित तारेस धक्का बसला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रसंगावधान राखून तेथील ग्रामस्थांनी त्याला कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दिगंबर एकुलता मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, विवाहित बहीण असा परिवार आहे. वीजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी ठरणारी दोन वर्षातील चौथी घटना आहे, त्याचबरोबर सुमारे 15 उघडे फुज बॉक्स गेली कित्येक वर्षे आहेत. वारंवार तक्रार करूनही वीज कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. गतवर्षी चव्हाण मळ्यालगतच्या अशाच घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले होते. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र वीज कंपनी गाफील राहिली आहे.