कृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

वाई - मेणवली (ता. वाई) येथे कृष्णा नदीत पोहत असताना पाण्यात बडून गोडवली-पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या बरोबरच्या अन्य दोघांना वाचविण्यात यश आले. आज दुपारी पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रोहन रतन मोरे (वय 30, रा. गोडवली-पाचगणी) असे मृताचे नाव आहे. त्याचा भाऊ रोहित व स्नेहदीप हणमंत वाघमारे (26, रा. विक्रोळी, मुंबई) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाचगणीतील घाटजाई देवीच्या यात्रेसाठी गोडवली येथील रतन विष्णू मोरे यांच्याकडे मुंबई येथील बहिणी व इतर नातेवाइक आले होते. यात्रा पार पडल्यानंतर दर वर्षीप्रमाणे मोरे कुटुंबीय नातेवाइकांसह मेणवली येथे फिरायला आले होते. यामधील तिघे जण पोहण्यास उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित मोरे व स्नेहदीप वाघमारे बुडू लागले. हे पाहून त्यांचा भाऊ रोहन त्यांना वाचविण्यासाठी गेला. दोघांना वाचविताना खोल पाण्यात शिरल्याने रोहन बुडाला. या वेळी गोंधळ झाल्याने खुदबुद्दीन अतनूर व सैफान मुल्ला या स्थानिक युवकांनी पाण्यात उतरून रोहित व स्नेहदीप यांना पाण्यातून बाहेर काढले. विशाल तावडे याने रोहनचा शोध घेतला. अर्ध्या तासाने तो सापडला. तिघांना तातडीने वाईच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच रोहनचा मृत्यू झाला होता. रोहित व स्नेहदीप या दोघांची प्रकृती ठिक आहे.

रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. मोरे यांचे नातेवाइक मेणवली परिसरात फिरून मुंबईला परतणार होते. मात्र झालेल्या दुर्घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहन बांधकाम व्यावसायिकाकडे सुपरवायझर म्हणून काम करीत होता. वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. बेसुमार वाळू उपशामुळे मेणवली घाट परिसरातील नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून, यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे परिसरात बोलले जात आहे.

Web Title: youth drawn in krishna river