
जत : अमृतवाडी (ता. जत) फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रेलरला दुचाकीस्वार धडकून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र शाहू सावंत (माडग्याळ, ता. जत) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ९ जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. जत पोलिस ठाण्यात मृताचा चुलत भाऊ दिनेश अंकुश सावंत (वय ३२, वळसंग, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे.