बेळगाव : किणये धरणावर पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

बेळगाव - किणये (ता. बेळगाव) येथील काही तरूण येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एक तरूण बुडाला.  स्वप्नील अरुण पाटील (17) असे या तरुणाचे नाव आहे. 

बेळगाव - किणये (ता. बेळगाव) येथील काही तरूण येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एक तरूण बुडाला.  स्वप्नील अरुण पाटील (17) असे या तरुणाचे नाव आहे. 

बेळगाव : संकेश्वरनजीक अपघातामध्ये दोन ठार; चार जखमी 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास किणयेतील काही युवक पोहण्यासाठी धरणावर गेले होते. स्वप्नीलसह इतर युवकांना पोहण्यासाठी येत होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने स्वप्नील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.

कांदा निर्यात बंदीच्या धोरणाविरोधात १५ ला व्यापार बंद 

तो बुडत असल्याचे त्याच्या मित्रानी पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला. हे ऐकून शेजारच्या गावातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. तसेच पाहणी करून  बेळगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनीही तातडीने स्वप्नीलचा शोध घेण्यास सुरूवात केली. स्वप्नील हा किणये येथील पाटील महाविद्यालयात कॉमर्सच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.

रत्नागिरी जिल्ह्यात साडेनऊशे बालके कुपोषित 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Missing who went swimming in the Kinaye Dam in Belgaum District