मिरजेत कृष्णाघाट येथे तरुणाचा खून

मिरजेत कृष्णाघाट येथे तरुणाचा खून

मिरज - वस्तीवरील शेळ्या-मेंढ्या चोरल्याच्या संशयावरून चोरट्यास केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला. दादू हणमंत राठोड (वय ३२, रा. जयसिंगपूर) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून मिरज कृष्णाघाट ते निलजी बामणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वस्त्यांवरून शेळ्या आणि बोकडांच्या सतत चोऱ्या होत आहेत. तेथे परगावाहून काही मेंढपाळ शेतात शेळ्या-मेंढ्या बसवण्यासाठी कळप घेऊन आले आहेत. त्यांच्या या कळपातील शेळ्या-मेंढ्या चोरीस जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत बरेच वाढले.

याच रस्त्यावरील नितीन बसगोंडा पाटील यांच्या शेतात या मेंढपाळांनी मेंढ्या बसविल्या आणि हे सगळे मेंढपाळ चोरट्यास पकडण्यासाठी सोमवारी रात्री शेतांमध्ये दबा धरून बसले. यावेळी दादू राठोड हा संशयित शेळ्या चोरण्यासाठी येताच त्याला या आठ मेंढपाळांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याने त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याचे उपचार सुरू असताना निधन झाले.

त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील पोलिसांना बराच खटाटोप करावा लागला. हा संशयित जयसिंगपूर येथील लमाण तांडा वस्तीवरील असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केल्यानंतर त्याची ओळख पटली. 

यांना केली अटक
पोलिसांनी सिद्धाप्पा व्हनमाने (वय ५०), माणिक हरीबा शेंडगे (५०), बिरदेव सोमा खरात (२५), सोमा बंडू खरात (६०), संजय दशरथ करांडे (३५), विष्णू आमसिद्ध करोडे (३५), आबासाहेब शंकर शेडंगे (४०) आणि राजू मरीबा करांडे (५०) सर्व जण रा. मिरज. या सर्वांना काही तासांमध्ये अटक केली. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com